spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! प्रचार कार्याला आला प्रचंड वेग! ग्रामीण भागात राहुल बोंद्रे यांची क्रेझ कायम!!

चिखली (हॅलो बुलडाणा) निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे प्रचार दौऱ्याना उधाण आले आहे. विधानसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या प्रचार दौऱ्याला गती निर्माण झाली आहे. मतदार संघातील गावोगावी सकाळी पासून अगदी रात्री पर्यंत हा प्रचार अव्याहतपणे सुरू आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुरू असलेला प्रचार दौरा रुईखेड मायंबा या गावी आला असता गावकऱ्यांनी प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
विधानसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहूल बोंद्रे यांनी मौजे रुईखेड मायंबा येथील लोकांशी थेट संवाद साधून त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती देत जागरूक करण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या विविध समस्यांवर चर्चा करून आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्या आशा व अपेक्षांचा आदर राखला जाईल असे वचन दिले. या दौऱ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने राहूल बोंद्रे यांचा विजयाच्या वाटेवरील प्रवास योग्य दिशेने होत असल्याचा विश्वास वृध्दिंगत झाला आहे . या प्रचार दौऱ्यामध्ये राहूल बोंद्रे यांना ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे . एवढे मात्र खरे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!