चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांची जाहीर सभा दि.15 नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आझाद चौक, धाड, ता. चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील धाड हे महत्त्वाचे गाव असून त्या ठिकाणी होत असलेली खा .इम्रान प्रतापगढी याची जाहीर सभा राहूल बोंद्रे यांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. खासदार इम्रान प्रतापगढी हे विधिमंडळ असो की, जाहीर सभा ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शायरी व भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. राहूल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेसाठी पंचक्रोशीतील मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.