बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राहुल बोंद्रे स्ट्रॉंग ठरत असून, विरोधकांच्या मेंदूत वेदना होत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमित्त चिखली मतदार संघासाठी आयोजित केलेल्या ‘प्रचार दौऱ्यात’ मौजे अमडापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. यामध्ये विनायक अदबाने, माधव अदबाने, दीपक आहेर, समाधान वाडकर, बाबुराव सवडतकर, राहुल सातकर, राहुल राऊत, शिवाजी राऊत, शुभम भालेराव, नितीन मोरे, वैभव वटकले व सुधाकर निकाळजे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस विचारांना साद घालत, शाहू, फुले,आंबेडकरांचे समानतावादी विचार अंगिकारून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.दरम्यान विरोधकांची धाबे दणाणले असून विरोधकांचा पराभव निश्चित असल्यामुळे त्यांच्या मेंदूत वेदना होत आहेत की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे.राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रचार दौऱ्यात विजयाच्या प्रचंड घोषणा होत असून,त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते.या प्रचार दौऱ्या दरम्यान राहुल बोंद्रे यांचे सहकारी तथा महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










