बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव जालना नॅशनल महामार्गावरील चिखली येथील सिद्ध सायन्स चौक येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ध्रूपतराव सावळे यांनी केले.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढा भरवून समर्थकांनी एकच जल्लोष केला होता.दरम्यान राहुल बोंद्रे म्हणाले की विजय आपलाच!
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले.यावेळी राहुल बोंद्रे समर्थकांनी भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार केला असून,राहुल भाऊ बोंद्रे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.याप्रसंगी
संदेश आंबेडकर, संदीप मनरोला, नरुभाऊ खेडेकर, रेखाताई खेडेकर,हाजी दादू सेट, कपिल खेडेकर,ज्योतिताई खेडेकर, हाजी पाशु सेठ,अशोक सुराड़कर, नंदू कराडे, संजय गाड़ेकर, नरेश शेळके,नितीन शिंगणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.