देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे डीआयजी अँटी गँगस्टर टास्क फ़ोर्सचे गुरमितसिंग चव्हाण निवडणूक प्रक्रियेवर करडी नजर ठेवून आहेत. आज त्यांनी देऊळगाव राजा व सिंदखेडराजा येथे भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
आज 2 नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा मतदार संघांचे पोलीस ऑबझर्व्हर IPS श्री गुरमितसिंग चव्हाण DIG अँटी गँगस्टर टास्क फ़ोर्स पंजाब यांनी देऊळगाव राजा भिवगांव चेक पोस्ट येथे भेट देऊन चेकिंग बाबतीत सूचना केल्या तसेच EVM स्ट्रॉंग रूम सिंदखेड राजा येथे भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.