बुलढाणा (हॅलो बुलढाणा )‘बापात दम असेल तर निवडणूक लढवावी’,असे आक्रमक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाचे लोकसभा संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांच्यावर पलटवार करताना केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड निवडणूक लढवीत असताना,भाजपाचे लोकसभा संपर्क प्रमुख विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजप श्रेष्ठींना परवानगी मागितली आहे.शिंदे निवडणूक लढविण्यासाठी ठाम आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ आणि भाजीपाला गलिच्छ म्हणून आमदार गायकवाड यांनी संबोधल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे त्यामुळे मी निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान आ.संजय गायकवाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की भाजपा कार्यकर्त्यांनी कितीही उचकवायचा प्रयत्न केला तर महायुतीत सर्वांना काम करावे लागणार आहे यामध्ये दोन्ही पक्षांची हित आहे.जर जिल्हाभरात आम्ही दोघेही एकमेकांच्या विरोधात गेलो तर दोन्ही पक्षाचे हे हिताचे राहणार नाही.विजयराज शिंदे ही चिल्लर केस आहे.त्यांच्या बापात दम आहे तर त्यांनी निवडणूक लढवावी.. चिखलीत माझा मुलगा कुणाल गायकवाड यांनी जो उमेदवारी अर्ज भरला तो विजयराज शिंदेंनी माघार घ्यावी म्हणून नाही ! विजयराज शिंदे हे गेल्या सहा महिन्यापासून महायुती विरुद्ध कारवाई करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विरोधात काम केले त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना सहा वर्षासाठी आवर्जून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी गायकवाड यांनी केली आहे.