बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात उद्या महालक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडणार असून,महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांच्या चेहऱ्यावर पराभवाची चिंता दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
लोणार-मेहकर विधानसभा मतदारसंघात
दोन्ही शिवसेना गटात सरळ लढत होणार असून,यंदा सिद्धार्थ खरात यांची बाजू भक्कम समजल्या जात आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे उद्यापासून प्रचाराला प्रारंभ करीत आहेत.खरात म्हणाले की,गेल्या पंधरा वर्षापासून मतदार संघात विकास रखडलेला आहे.शेतकऱ्यांची दैन्यवस्था झाली असून शेतकरी पुत्रांचे हात कामाविना रिकामी आहेत.त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी तसेच बेरोजगारी पर्यटन उद्योजक असे अनेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरण्यासाठी मी निवडणुकीत उतरलो आहे.महाविकास आघाडी या मतदारसंघात परिवर्तन घडविणारा असून जनता देखील माझे पाठीशी आहे.त्यामुळे मला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा असे आव्हान देखील सिद्धार्थ खरात यांनी दिले आहे.दरम्यान शिंदे गटाची शिवसेना महायुतीची उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांना खरात यांचे कडवे आव्हान असून त्यांचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा सुद्धा रंगत आहे.














