spot_img
spot_img

आमदार-नेते कोऱ्या तर ‘लाडके विद्यार्थी’ फाटक्या कपड्यात! -दिवाळी आली तरी 1530 शाळेतील लाभार्थ्यांचा गणवेश अडकला अडचणींच्या कैचीत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अर्धे शैक्षणिक सत्र उलटले..स्वातंत्र्य दिन जुन्या कपड्यावर साजरा झाला..विधानसभा निवडणूक धडकली..उद्या दिवाळी साजरी होत असून निवडणुकीसाठी वोट मागणारे आमादार-नेते कोऱ्या करकरीत कपड्यात व्हीचा आकार करीत दोन बोट दाखविताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे लाडके विद्यार्थी फाटक्या कपड्यात दिसत असल्याचे अस्वस्थ चित्र आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुक्यापैकी देऊळगाव राजा व शेगाव तालुक्यात कापडांचा पुरवठा वगळता तब्बल 1530 शाळे मधील लाभार्थी विद्यार्थ्यांचा गणवेश कोणत्या अडचणींच्या कैचीत अडकला आहे हे राज्य शासनाला आणि शिक्षण विभागालाच माहित असावे !
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक नियमित व दुसरा स्काउट-गाइडचा गणवेश देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पहिल्या सत्रातील घटक चाचणीही संपली. स्वातंत्र्यदिन संपन्न झाला.विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली.उद्या दिवाळी आहे. तरी अद्याप गणवेशाबाबत विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच आहे. समग्र शिक्षा अंतर्गत राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश वितरण करण्यात येते. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाताे. या गणवेशाचे पैसे प्रत्येक विद्यार्थ्यांना दिले जात हाेते.मात्र, यावर्षी शासनाने नियमित गणवेश व स्काउट- गाइडचा गणवेश असे दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यातील नियमित गणवेश महिला बालविकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांकडून शिवून मिळणार आहे. या गणवेशाचे कापड देऊळगाव राजा व शेगाव तालुक्यात बचतगटांना प्राप्त झाले आहे. मात्र, त्यांच्याकडील शिलाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थी लाडक्या विद्यार्थ्यांना गणेवेश कधी मिळतील हा प्रश्न असून अनेक अडचणींच्या कैचीत हा गणवेश सापडला आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला असून पुढारी व कार्यकर्ते कोऱ्या करकरीत कपड्यात दिसून येत असल्याने त्यांचे या ‘लाडक्या विद्यार्थ्यांच्या’ फाटक्या कपड्यांकडे लक्ष कधी जाणार ?असा प्रश्न विचारला जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!