देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना नागरिकांनी चोरांपासून सावधान व्हावे असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे .
पोलीस स्टेशन देऊळगाव राजा तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,सण उत्सवा निमित्त बाहेरगांवी गेल्या नंतर घरात ▪️चोरी होऊ नये म्हणुन घ्यावयाची दक्षता
1. घर कुलुप बंद करून बाहेर गावी जाताना शेजारी आपला पहारेकरी या म्हणी प्रमाणे शेजाऱ्यास आपल्या कुलुपबंद घरावर लक्ष ठेवण्या बाबत कळवावे.
2. घराच्या दरवाज्यास उच्च प्रतीचे कुलुप व कोंडा लावावे.
3. बाहेरून दिसणारे घरातील लाईट चालू स्थितीत ठेवावे.
4. शक्य असल्यास आपल्या घराच्या आवती भोवती चांगल्या प्रतीचे (नाईट व्हिजन) CCTV कॅमेरे लावण्यात यावे.
5. आपल्या गल्लीत काहीतरी विक्री करण्याचे उद्देशाने अनोळखी इसम आल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी, शक्य झाल्यास आपल्या मोबाईल मध्ये त्या इसमाचा फोटो काढुन घ्यावा.
6. बाहेरगावी जाताना सबंधीत पोलीस स्टेशन बीट अंमलदार यांना कळवावे.
7. शक्य झाल्यास घरातील सोन्या, चांदीचे दागीने किंवा घरातील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरातील कपाटात न ठेवता बँकेमध्ये, लॉकर मध्ये ठेवावे कारण चोरट्यांचे घरातील कपाट हे पहिले टार्गेंट असते.
8. आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील लाईट रात्रीचे वेळी चालू स्थितीत राहतील या बाबत प्रयत्न करावे.
9. चोरी केल्या नंतर लवकरात लवकर गावाबाहेर पडता यावे या दृष्टीने गावातील किंवा शहराच्या कडेला असलेली घरे हि चोरट्यांचे टार्गेटवर असतात, त्यामुळे गावाच्या किंवा शहराच्या कडेला असणाऱ्या घर मालकानी जास्त काळजी घ्यावी.
10. आपल्या गल्लीत किंवा गावा मध्य ग्राम सुरक्षा दल स्थापन करून आळी पाळीने आपल्या गल्लीत किवा गावात रात्रगस्त ठेवावी.
11. शक्यतो आपल्या घरात सर्व मानसे बाहेर गावी न जाता एखादा व्यक्ती घरी राहिल या बाबत दक्षता घ्यावी.
पोलीस मदती साठी संपर्क 112 पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा 07262242400
ठाणेदार देऊळगाव राजा 9823100016
पोलीस दल आपल्या सेवेसाठी २४ तास सतर्क आहे.
▪️संतोष महल्ले पोलीस निरीक्षक
ठाणेदार पो.स्टे. देऊळगाव राजा