बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 6 उमेदवारांचे 11 नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
आज 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.दुपारी तीन वाजता ही वेळ संपणार असून उद्या अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यानंतर यातील वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.चार नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेतअर्ज मागे घेण्याची दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असणार आहे.त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल तत्पूर्वी चिन्हाचे वाटप देखील करण्यात येणार असून आतापर्यंत बुलढाणा विधानसभा मतदार संघासाठी 6 उमेदवारांचे 11 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.दरम्यान आज शेवटचा दिवस असल्याने आज अनेकांची अर्ज दाखल होणार असल्याची चिन्ह आहेत.