बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अधिकाधिक प्रकाशमान करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जयश्रीताई सुनील शेळके यांच्या ‘हाती’ मशाल दिली आहे. दरम्यान जयश्रीताईंनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ॲड.संजय राठोड यांच्या निवासस्थानी काल भेट देऊन चर्चा केली आहे.या चर्चेत काय प्लान ठरला ते माहित नाही परंतू आज 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी च्या मुहुर्तावर ‘जयश्री’ ताईसाठी हजारो ‘हात’ उंचावणार असून अतिविराट शक्तीप्रदर्शनात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री ताई उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या अधिकृत उमेदवार अँड.जयश्रीताई सुनिल शेळके यांनी काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ॲड.संजय राठोड यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये प्रदेशातील राजकीय घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले.
यावेळी अँड. गणेशसिंग राजपूत, विनोद बेंडवाल, तुळशीराम नाईक, सय्यद इरफान, गौतम मोरे, विशाल बावस्कर, असिफ पठाण, भूपेश जाधव, विशाल गवई, सय्यद मतीन, वैभव चव्हाण, विजय तायडे, उल्हास पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाविकास आघाडी एकजुटीने जयश्री ताईंना आमदार म्हणूनच विधानसभेत पाठवणार असल्याचा यावेळी निर्धार करण्यात आला आहे.दरम्यान उबाठा शिवसेना गट व शिंदे गट शिवसेनेत काट्याची लढत रंगणार आहे.











