मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे माजी आमदार चैनुसूख संचेती यांनी आज उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उफाळली होती.दरम्यान आमदार राजेश एकडे आणि चैनुसूख संचेती यांच्यामध्ये सरळ लढत होण्याचे संकेत आहेत.
मलकापुर तहसील कार्यालय येथे महायुतीचे विधानसभेचे उमेदवार माजी आमदार चैनुसुख संचेती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्यसभा खासदार मा. अजयजी संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी आशीर्वाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिला,भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय मंडळ, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती नोंदवली.











