चिखली (हॅलो बुलडाणा) मेटाकुटीस आलेला शेतकरी महागाईने होरपळलेली कष्टकरी सामान्य जनता, सुषिक्षीत बेरोजगारांसह शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी सदैव झगडणारे तसेच संविधान व लोकषाही वाचविण्यासाठी मविआ कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुलभाउ बांेद्रे उदया 29 ऑक्टोंबर 2024 रोजी आपला उमेदवारी विषालकाय जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरणार आहे. याप्रसंगी अभाकॉ कमिटीचे महासचिव खासदार मुकूलजी वासनिक, खासदार कल्याणराव काळे, प्रदेष कॉग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी, संदेष आंबेडकर यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची विषेष उपस्थिती राहणार आहे. चिखली विधानसभा मतदार संघातील तमान जनतेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिखली येथील ऐतिहासीक राजाटॉवर या ठिकाणी मंगळवारी दुपारी 1 वाजता उपस्थित राहुन आपले आर्षिवाद देत हात बळकट करण्याचे आवाहन राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे. राहुलभाउ बोंद्रे यांचा नामांकन अर्ज दाखल होत असल्याने चिखली मतदार संघातील निवडणुक सरळ चुरषीची आणि रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
विशालकाय जनसमुदायात यांचीही राहणार उपस्थिती ..
राहुलभाउ बोंद्रें यांनी आजवर चिखली मतदार संघात केलेल्या कामांची दखल घेत महाविकास आघाडी तर्फे कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमदेवारी बहाल केली आहे. कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता उपस्थितीत जनसमुदायासह अभाकॉ कमिटीचे महासचिव खासदार मुकूलजी वासनिक, खासदार कल्याणराव काळे, प्रदेष कॉग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी, संदेष आंबेडकर यासह आ.डॉ.राजेंद्र षिंगणे, आ.राजेष एकडे, आ. धिरज लिंगाडे, महाविकास आघाडीतील षिवसेना नेते प्रा.नरेद्र खेडेकर, रॉकॉच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई खेडेकर, माजी आमदार हर्षवधन सपकाळ, मा.आ.राणा दिलीपकुमार सानंदा, धृपतराव सावळे, जालींधर बुधवत, प्रदेष उपाध्यक्ष अॅड. गणेषराव पाटील, शामभाउ उमाळकर, विजय आंभोरे, संजय राठोड, रामविजय बुरूंगले, अॅड. अनंतराव वानखेडे, ज्ञानेष्वरदादा पाटील, धनंजय देषमुख, हाजी दादुसेठ, नरेष शेळके, अॅड.सौ.जयश्रीताई शेळके, डॉ.स्वातीताई वाकेकर, हाजी रषिदखॉ जमदार, दिलीपराव जाधव, शैलेष सावजी यासाह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
जनतेतुन प्रचंड मताधिक्य घेत थेट नगराध्यक्ष पदी विराजमान होत चिखली विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात षिरकाव करणा-या राहुलभाउ बोंद्रे यांनी आपल्या कार्य पध्दतीचा ठसा जनमानसाच्या मनात उमटवित दोन वेळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले तर त्यांना दोनवेळा अल्प मताच्या फरकाने पराभावाचा सामानाही करावा लागला. मात्र पराभवाने खचुन न जाता सर्वसामान्यांच्या प्रष्नांसाठी स्वतःला झोकुन देणारा लढवया व युवकांचे हद्यसम्राट म्हणुन ख्याती प्राप्त करीत वेळप्रसंगी न्याय हक्काच्या लढाईसाठी कारावासही भोगला हे येथे उल्लेखणीय.
चिखली येथील ऐतिहासीक राजाटॉवर या ठिकाणी अर्ज दाखल करण्याच्या पार्ष्वभुमीवर होत असलेल्या सभेसाठी कॉग्रेस व महाविकास आघाडीतील सर्व विभाग, सेल, शाखातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मविकास आघाडीच्या वतीने समाधान सुपेकर, श्रीकिसन धोंडगे, दिपक म्हस्के, सुनिल तायडे, नंदु षिंदे, लखन गाडेकर, तुळषिरामदादा काळे, अतहरोद्यीन काझी, श्रीराम झोरे, रवि तोडकर, निलेष अंजनकर यांनी केले आहे.