बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नसल्याने व शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीला वैतागलेल्या अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मंगेश गायकवाड़ भाजप बूथ प्रमुख करण खेड, संदीप सवाळे, प्रवीण सपकाळ, अमोल खरात, दीपक मोरे, अजय इंगळे, संदीप सपकाळ, अनंता खरात, राम गायकवाड़, राजेंद्र खरात, विनोद गायकवाड़, अक्षय अंभोरे, नवजीत गावंडे, अविनाश इंगळे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.