बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे चिखली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ‘लाडक्या बहिणीची’ गर्दी उसळणार असल्याचे चिन्ह आहे.
जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्याचं नियोजन केले असून 29 ऑक्टोंबर ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चिखलीतील राजा टॉवर येथून 29 ऑक्टोंबरला दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.त्यांच्या नामांकनासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकरी आणि लाडक्या बहिणींची मोठी गर्दी उसळला असल्याची चित्र चिखलीत दिसून येत आहे.