spot_img
spot_img

अट्टल चोरट्यांना पकडणार नाही ती एलसीबी कसली ? -बुलढाणासह इतर सात जिल्ह्यातील 23 गुन्ह्यांची उकल !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चोर छोटी मोठी चोरी करतात परंतु त्यांना माहित नाही की ,एक ना एक दिवस एलसीबीचा हात आपल्या काळ्या कॉलरपर्यंत पोहोचणार ! तेच झाले.बुलढाणा एलसीबी व खामगाव शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने सात जिल्ह्यातील 23 गुन्ह्याची उकल करण्यात आली.दरम्यान 9,00,000 रुपये किमतींच्या 23 मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.

मुख्य आरोपी विशाल दुर्योधन इंगळे अकोट ता अकोला हा आहे.सदर आरोपी बस स्टँड , आठवडी बाजार व अन्य ठिकाणावरून दुचाकी चोरी करीत होता. नागपूर,वाशिम,हिंगोली,अमरावती,वर्धा,जळगाव जिल्ह्यात या चोरट्याने धुमाकूळ घातला होता.दरम्यान बुलढाणा एलसीबी व खामगाव शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने सात जिल्ह्यातील 23 गुन्ह्यांची उकल करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात अशोक लांडे यांच्या आदेशाने पथकाने केली आहे .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!