बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात प्रभू गारोळे शासकीय कर्मचारी असून सुद्धा दुसऱ्या कंत्राटदाराच्या नावावर टेंडर घेऊन स्वतःच काम करीत असल्याचा आरोप गणेश शिंदे यांनी केला आहे. दरम्यान लिपिक प्रभू गारोळे व अकाउंटंट शैलेंद्र कुमार यांच्या कार्यकाळातील टेंडरच्या कामाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रधान महालेखा कार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.त्यामुळे कर्मचारी संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. कार्यालयातील अकाउंटंट शैलेंद्र कुमार हे हजर झाल्यापासून त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या टेंडरची चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी गणेश शिंदे राहणार भादोला यांनी केली आहे.लिपिक प्रभू गारोळे व अकाउंटंट शैलेंद्र कुमार हे साबा कार्यालयात कार्यरत झाल्यापासून त्यांना टेंडर विभागासंबंधी प्रभास देण्यात आला आहे.मात्र ते संगममताने व संबंधित कंत्राटदाराशी हात मिळवणी करून एकाच कंट्राट दाराला किंवा मर्जीतील कंत्राट दाराला कंत्राट देण्याचे काम करीत आहे.पात्रता असलेल्या कंत्राटदाराला डावलण्यात येते.कंत्राटदारासंदर्भात बीड कॅपिसिटी तपासल्या जात नाही.कागदपत्रांची तपासणी व्यवस्थित केल्या जात नसून ज्याने पैसा दिला त्यांना कंत्राट दिला जातो शिवाय त्यांची बिल देखील हे दोघे व्यवस्थित अदा करतात.
दरम्यान लिपिक प्रभू गारोळे व अकाउंटंट शैलेंद्र कुमार यांच्या कार्यकाळातील टेंडरच्या कामाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रधान महालेखा कार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.अन्यथा न्यायास्तव आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे .