बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती समाज यांचे शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. या समाजाने कधीही भावनांचा उद्रेक होऊन दिला नाही. शांत, संयमी अशा या समाजाने नेहमीच संविधानाचा आदर राखला आहे. काॅंग्रेस विचारधारेतही अशीच सर्व समावेशकता आहे. संवैधानिक आणि अहिंसक मार्गाने सामाजिक न्याय व राष्ट्रीय एकात्मता राखणे यावर काॅंग्रेस पक्षाचा विश्वास असून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्रीयन ख्रिश्चन समाजाचा नुकताच एक राज्यस्तरीय मेळावा संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळेस ख्रिश्चन महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सतीश मेहेंद्रे यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हटले कि, काँग्रेस विचारसरणी सोबत घट्ट पणे जुळलेला ह्या समाजाला काँग्रेस पक्ष मात्र दुय्यम दर्जाची वागणूक देते हे ह्या समाजाचे दुर्देव्य आहे. समाजाला नेहमीच गृहीत धरून सत्ता व संघटनेच्या पदां पासुन ह्या समाजाला दुर ठेवल्या जाते अशी खंत देखील मेहेंद्रे यांनी बोलून दाखवली.याच मनोगताचा धागा पकडून आ. थोरात पुढे म्हणाले की, ख्रिस्ती समाजाचे नेहमीच पक्षाला पाठबळ मिळते हे अमान्य करता येत नाही. येणारा भविष्य काळ हा महाविकास आघाडीला सत्ते कडे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे निश्चितच ह्या समाजाला अग्रक्रमाने न्याय देण्यात येईल असा विश्वास आ. थोरात यांनी उपस्थितांना दिला. यावेळी आ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही, ख्रिस्ती समाजाच्या अडचणी दूर होण्यासाठी काॅंग्रेस पक्ष प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही दिली. राज्यस्तरीय बैठकीतील प्रमुख उपस्थितीतां मध्ये सर्वश्री दिलीप नाईक, (नंदुरबार) सतीश मेहेंद्रे,(बुलडाणा) सॉलोमन गायकवाड (श्रीरामपूर), राजन नायर (पुणे), विजय नले (चंद्रपुर), डॉ. राजीव इंगळे (छ. संभाजी नगर), बबन कांबळे (रायगड), अनिल भोसले (संगमनेर), प्रा. बाबा खरात (संगमनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सद्य स्थितीत समाजाच्या अडचणी यावर भाष्य केले. यावेळेस आ. थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन समाजाच्या हक्काची लढाई लढणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या बैठकीस दीपक कदम, अविनाश काळे, चंद्रकांत उजागरे, नरेंद्र गेडाम, प्रफुल्ल असुरलेकर, डँरील डिसोझा, वॉल्टर कांबळे, किरण चांदेकर, डेव्हिड काळे, बन्यामीन काळे, अजित सुडगे, रमेश गावित, सॅमसन लोबाे, भाऊसाहेब तोरणे, आयशा मुक्री, प्रदीप पवार, भाऊसाहेब नेटके, श्रीधर भोसले, प्रभाकर चांदेकर, दिनकर यादव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते.