spot_img
spot_img

बुलढाण्यात विमानतळ होणार ? -केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली मागणी !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याला ऐतिहासिक आणि पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे या भौगोलिकस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून बुलडाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारत निर्मितीचा कार्य सध्या सुरू आहे. आज भारत हा जगाची तिसरी अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे. देशांतर्गत रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुक या तिन्ही दळणवळणाच्या साधनांचा उपयोग नागरिकांना करता यावा या दृष्टिकोनातून देशपातळीवर काम सुरू आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जागतिक कीर्तीचे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी बुलढाणा जिल्ह्यात आहे. शिवाय संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ असून आनंद सागर हे पर्यटक क्षेत्र आहे या धार्मिक अध्यात्मिक आणि पर्यटनस्थळाला भेटी देण्यासाठी देश विदेश आणि राज्यातील पर्यटक या ठिकाणाला भेटी देत असतात देश विदेशातील पर्यटकांच्यासाठी विमान सेवा ही जवळपास 125 किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणी पोचण्यासाठी किमान चार तास लागतात पर्यटकांच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटक स्थळाचा विकस करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन विमानतळाची निर्मिती बुलढाणा येथे करण्यात यावी अशी आग्रही मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!