बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळूनी टाकून मतांची भीक मागणाऱ्या महायुती सरकारने शेतकरी व नागरिकांचे आर्थिक शोषण. प्रथम थांबवावे. महाराष्ट्रातील बारा कोटी लाडक्या भावांवर प्रत्येकी 63 हजार रुपये तर शासनाच्या तिजोरीवर चाळीस हजार कोटींचे कर्ज माहायूती सरकारचे महापापच आहे. जुलमी शेतकरी अध्यादेश त्वरित रद्द करा, पोलीस अधीक्षकांमध्ये हिम्मत असेल तर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून दाखवा. यासह नागरी मागण्यांची त्वरित पूर्तता करा अन्यथा मुंबईस्थित राज्यपालांच्या राजभवनाला घेराव टाकू असा आक्रमक पवित्रा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आक्रोश निषेध मोर्चाच्या जाहीर सभेत जाहीर केला. त्यामुळे मुंबईस्थित राजभवन सूद्धा अलर्ट मोडवर आले आहे.
8 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निषेध मोर्चाच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करतांना प्रबोधनकार अँड रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्र, गृहमंत्री व संबंधित सचिवालयांना निवेदन सादर केले.
मनोगतातून प्रबोधनकार रोठेंनी आपल्या खास रोखठोक शैलीतून समाचार घेतला. लाडकी बहीण योजना, 100 200 चे बॉण्ड बंद करणे, तेलाचे भाव वाढणे,जुलमी करांचा अध्यादेश पारित करणे, जिल्ह्यातील अवैध धंदे,गहाळ महिला मुलींचा शोध घेने,पोलीस प्रशासन आणि महायुती सरकारच्या निर्णयांचा खरपूस समाचार घेतला.
निवेदनामध्ये 6 सप्टेंबर 2024 रोजी राज्यपालांच्या सहीने 50,000 रु दंड वृक्षतोडी संदर्भातील अध्यादेश रद्द करणे, बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करने, महिला मुली गहाळ आकडेवारी जाहीर करणे , मोताळा व बुलढाणा तालुक्यातील रस्ते नाल्या दुरुस्ती करने, विकास कामांचे ऑडिट करने यासह जिल्ह्यातील ज्वलंत नागरि समस्यांच्या समावेश आहे.यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, शेख सईद शेख कदीर,सुरेखाताई निकाळजे, पंचफुला गवई, निर्मलाताई रोठे, आशाताई गायकवाड, शेख यूसूफ,……यांच्यासह शेकडो पदाधिकारी, शेतकरी,शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.