खामगाव (हॅलो बुलढाणा) बाप एवढाही निष्ठावर असू शकतो काय ? हा प्रश्न देशवासीयांना पडला आहे.कारण या बापाने दोन चिमुकल्या लेकींना पुलावरून नदीत फेकले.यामुळे दोन्ही निरागस बालिकांचा करुण अंत झाला. निष्ठुर पित्याच्या या टोकाच्या पावलाने बुलढाणाच काय अख्खा देश हादरून गेला.
काल रात्री उशीरापर्यंत हा भीषण घटनाक्रम घडला. शनिवारी ५ ऑक्टोबरच्या रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान दोन्ही बहिणींचे मृतदेह हाती लागले. प्रकरणी पित्यास खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजिक असलेल्या लोणी कदमापूर येथील आरोपी पित्याचे नाव शेख हारून शेख शब्बीर असे आहे. निर्दयी बापानेच सात वर्षीय कुमारी सदफ व नऊ वर्षीय कुमारी आलिया या दोघा चिमुकल्या बहिणींना बाळापूर जिल्हा अकोला नजीकच्या नदीत फेकले. बाळापुर ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील विटांच्या भट्ट्या असलेल्या परिसरात हे कृत्य केले.














