बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हातावर पोट असणाऱ्या 37 वर्षीय युवा मजुराने निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना आज दि 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
अमोल लक्ष्मण घुले वय 37 वर्षीय रा. जुना गाव वार्ड 01 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मलकापूर रोडवर माऊली हॉटेल जवळ हनवतखेड रोडवरील निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. अमोल घुले हा युवक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप करू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ आई असा मोठा परिवार आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.