साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा /दर्शन गवई)काल नवरात्र उत्सव सुरु झाला असून पहिल्याच उपवासाच्या दिवशी महिलांनी भगर आणि भगरीचे पिठापासून बनविलेल्या भाकरी खाल्ल्याने पिंपळगाव सोनारा येथील २५ ते ३० महिलांना मळमळ व उलट्या झाल्या आहेत . त्यांना तातडीने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले आहेत . सर्व रुग्णांची परिस्थिती चांगली असून महिलांनी काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे .
पिंपळगाव सोनारा येथील नारायण ठोसरे आणि रेखा ठोसरे यांना प्रथम मळमळ व उलट्या झाल्या . पहिला उपवास असल्याने त्यांनी भगरीच्या पिठाची भाकरी आणि आमटी खाल्ल्याने मळमळ होऊन उलटी झाली . त्यानंतर गावातील इतर महिलांना सुध्दा त्याच पध्दतीने मळमळ आणि उलटी झाल्याने गावात खळबळ उडाली . भगरीतून विष बाधा झाल्याची माहिती काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली . आज सकाळी सहा रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी तातडीने सर्वांवर उपचार सुरू केले . तर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांनी उपचार घेतले आहेत . या अगोदर बीबी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सोमठाणा येथे महाशिवरात्री दिवशी भगरीतून विष बाधा झाली होती . आजही अनेक किराणा दुकानातून मुदत संपल्यानंतर भगरीची विक्री सुरू आहे . तर मुदत संपल्यानंतर भगरीचे पिठ तयार करून विकले जात आहे . त्यामुळे ग्राहकांनी उपवास करीत असताना भगर व पिठ खाणे टाळावे.यावेळी संगीत राजपूत , मिना राजपूत , लक्ष्मी राऊत , जगणं राऊत , अनिता भागवत ठोसरे , अनिता रघुनाथ ठोसरे , चंद्रकला तेजराव पळसकर आणि गिता लक्ष्मण भागिले , चंद्रभागाबाई पळसकर , सविता बिनोरकर , शशिकला नारायण ठोसरे , लक्ष्मी भागवत ठोसरे , नंदाताई सुधाकर ठोसरे , दर्शन ठोसरे , प्रसाद ठोसरे यांच्यावर उपचार करण्यात आले. तर देऊळगाव
मही ग्रामीण रुग्णालयात बबन घुगे,लता घुगे,ज्योती घुगे, मिरा चितळे, लता दौंड,अक्षदा बाबर, गिता निकाळजे, बोरकर उपचार घेत आहेत .
▪️डॉ. संदीप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी म्हणाले ..
किराणा दुकानातून भगर घेतांना मुदत संपलेल्या तारखेची भगर घेऊ नये या बाबत सर्व किराणा व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.