बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आग पाणी आणि वीज कधी भीषण नुकसान करेल सांगता येत नाही.
बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे अचानक हॉटेल व जनरल स्टोअरला भीषण आग लागली आणि आगीत व्यावसायिकांचे जवळपास 23 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पिंपळगाव सराई येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोय सुविधेसाठी दर्गा परिसरात अनेक दुकान व हॉटेल आहे. आज 4 ऑक्टोबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास हॉटेल व जनरल स्टोअरला भीषण आग लागली यात व्यावसायिकांचे जवळपास 23 लाखांचे नुकसान झाले आहे. सैलानी दर्गा जवळ शेख सरदार शेख सांडू यांची हॉटेल तसेच शेख इरफान शेख फक्रुद्दीन यांचे जनरल स्टोअरला शुक्रवारी सकाळी 4 वाजेच्या सुमारास आग लागली, दोन्ही व्यावसायिक प्रतिष्ठान आजूबाजूला असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक नागरिकांना समजतात त्यांनी धावपळ सुरू केली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी अग्निशमन दलाला रवाना केले तसेच रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत देखील घटनास्थळी पोहोचले.स्थानिक नागरिक व बुलढाणा अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले परंतु तोपर्यंत सर्व काही जळून गेले होते.सकाळी 10 वाजता मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनेचा पंचनामा केला यात जवळपास 23 लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे.














