चिखली (हॅलो बुलडाणा) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे,यांनी सावरगाव डुकरे या गावी शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन फाडले म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते,परंतु त्याच गावात विरोधी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन सुरू केल्याने सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून राहुल बोंद्रे यांनी आपल्या आंदोलनाची समाप्ती केली.परंतु अशाप्रकारे अर्धवट सोडलेले हे आंदोलन त्यांनी राज्यपाल महोदयांना शेतकऱ्यांच्या रक्ताने केलेल्या एक लाख सह्यांचे निवेदन देवुन पूर्ण करण्याचे ठरवले व तशी घोषणाही केली होती.
सावरगाव डुकरे येथील अन्न त्याग आंदोलन लवकरच संपल्यामुळे राहुल बोंद्रे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधी पक्षांना या शांततेची योग्य परीक्षाच करता आली नाही असे म्हणता येईल.
राहुल बोंद्रे यांचे एकाच ठिकाणी चालणारे अन्नत्याग आंदोलन संपले,त्यानंतर रक्तानी लिहलेले निवेदन राज्यपालांना देण्याच्या पूर्ततेसाठी,राहुल बोंद्रे प्रत्यक्ष मैदानात उतरले असून प्रत्येक दिवशी त्यांच्या हजारो लोकांशी भेटीगाठी होत आहेत.राहुल बोंद्रे हे लोकांशी कट्ट्यावर, चावडीवर, पारावर, उत्सवात,शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट घेत आहेत,आणि लोकांनाही त्यांच्यात एकदम मिसळणारे राहुल बोंद्रे हे आपल्या समस्या मांडण्यासाठीचे आपले प्रतिनिधी वाटत आहे.एकीकडे स्टेजवर एका व्यक्तीने बोलायचे आणि खाली हजारो लोकांना बसवून ठेवायचे हा कार्यक्रम सुरू असताना,राहुल बोंद्रे दहा,वीस, शंभर, पन्नास लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी वार्तालाप करत आहेत.त्यामुळे लोकांना चर्चा करताना आनंद मिळत आहे,आपले बोलणे कोणीतरी ऐकून घेत आहे याचे समाधान मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारने दिलेले भांडे घेण्यासाठी देखील तास न तास यांचे भाषणे ऐकून कंटाळा आला तरी नाईलाजाने जागेवर बसून राहावे लागत असल्याबद्दल अनेक तक्रारी जनता करत आहेत.
रक्तांच्या सह्यांच्या निमित्ताने राहुल बोंद्रे यांचा पूर्ण मतदारसंघात प्रत्येक घरापर्यंत दौरा होत आहे, निवडणुकीच्या अगोदरच सगळीकडे आपोआप प्रचार होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे.
अशा प्रकारे संकटातून संधीची निर्मिती करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व सबंध जनतेतून सहानभूतीची एक नवीन लाट तयार होत आहे.या लाटेचे रूपांतर मतदानात झाल्यास राहुल बोंद्रेंना चिखली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी होण्यास जास्त प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही.तूर्तास एवढेच..