spot_img
spot_img

💥 ब्रेकिंग ! मुंबई -नागपूर महामार्गावर 2 जणांना चिरडले ! -चिखला फाट्यावर घडला भीषण अपघात !

बिबि (हॅलो बुलढाणा/ भागवत आटोळे )
नागपूर मुंबई महामार्गावर बिबी शहराजवळील चिखला फाट्यावर सायंकाळी सात वाजता दरम्यान ट्रक व दुचाकी मध्ये जबर धडक झाली या धडकेत पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.

प्राथमिक माहितीनुसार, लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधरी, व दत्तात्रय बाळाजी चौधरी हे दोघेजण बाईक क्रमांक MH28 AQ 5350 ने बिबी वरून आपले काम आटपून पिंपरी खंदारेकडे जात असताना मेहकर वरून जालन्याकडे जात असताना चिखल्या फाट्यावर MH 12 TV 2067 या ट्रकने जोरदार धडक दिली.या धडकेत पिंपरी खंदारे येथील 2 दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे. घटनेची माहिती कळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करुन ट्राफिक सुरळीत केली.अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे .वृत्त लीहि पर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!