बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कोट्यावधींची विकास कामे खेचून आणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा व नवनियुक्त सरपंच देवा भाऊ दांडगे यांचा लक्ष्मीनारायण अपारमेंट च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
बुलढाणा येथील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या वतीने 29 सप्टेंबरला सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विक्रमी विकासकामे केल्याबद्दल आणि ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच देवा भाऊ दांडगे यांचा याप्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मीनारायण अपार्टमेंट मध्ये आमदार गायकवाड यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.दरम्यान सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की,समस्यांची सोडवणूक करणे कर्तव्य असून विकास कामांना प्राधान्य देत आलो आहो.नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून आपल्या इतरही मागण्या लवकरच पूर्ण होतील,अशी ग्वाही यावेळी आमदार गायकवाड यांनी दिली.