spot_img
spot_img

सोनम वांगचूक यांच्या लढ्याला मलकापुरातून ‘जनआक्रोश’! रस्त्यावर उतरला जनसागर; ‘शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा द्या, लडाखला राज्याचा दर्जा द्या’च्या घोषणांनी शहर दणाणलं!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) लडाखचे शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मलकापूर शहरात ‘सोनम वांगचूक सपोर्ट समिती’च्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “भारत माता की जय”, “संविधान अमर रहे” यासह सरकारविरोधी घोषणांनी आंदोलनाला आक्रमक स्वरूप आले.

मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.

या मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्टपासून देशभर तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

मोर्चात ॲड. साहेबराव मोरे, संभाजी शिर्के, हरीश रावळ, गजानन ठोसर, डॉ. कोलते, डॉ. सुरळकर, मंगलाताई पाटील, रशिदखा जमादार यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य, पत्रकार हरी गोसावी, हनुमान जगताप, प्रवीण राजपूत, अजय टप, अनिल गोठी, कैलास काळे, करण झनके व अनेक नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!