spot_img
spot_img

चिखलीत गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘फायनल वार’! 8 गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला स्वप्निल काकफळे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध; साहिल शिंगणे अन् अनिकेत श्रीमंत 3 महिन्यांसाठी तडीपार… आता पुढचा नंबर कुणाचा?

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि वारंवार कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध चिखली पोलिसांनी आता थेट ‘फायनल वार’ सुरू केला आहे. गंभीर स्वरूपाचे तब्बल 8 गुन्हे दाखल असलेल्या स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे (वय 25) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत त्याला एक वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर साहिल राजेंद्र शिंगणे आणि अनिकेत शाम श्रीमंत या दोघांना तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक तथा चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी स्वप्निल काकफळे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर एमपीडीए प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर आदेश झाल्यानंतर 18 जुलै 2026 रोजी त्याला थेट कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्री चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणे, गांजा सेवन करून सार्वजनिक शांतता भंग करणे, जुगार खेळविणे तसेच गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कथित गुन्हेगारी वर्तनामुळे शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, साहिल शिंगणे आणि अनिकेत श्रीमंत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत कारवाई करत दोघांनाही तीन महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर,ज्ञानेश्वर शिंदे तसेच संजय भुजबळ स्था.गु.शा बुलडाणा यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!