spot_img
spot_img

“लाडक्या योजनेने’ केली तब्बल 244750 रुपयांची फसवणूक!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना नव्हे तर अनेक लाडक्या योजना सध्या कार्यान्वित झाल्याचे दिसून येत आहे.एका लाडक्या बहिणीची तब्बल 244750 रुपयांची फसवणूक झाल्याची बाब देऊळगाव राजा येथील विठाई नगर येथून समोर आली आहे.

सत्ताधारी विविध घोषणा करून लाडक्या योजनांचा पाऊस पाडत असून याचं अनुकरण चोरटेसुद्धा करीत आहेत.एका अज्ञात चोरट्याने भाबड्या लाडक्या बहिणीला 244750 रुपयांनी
गंडविले.झाले असे की,देऊळगाव राजा येथील विठाई नगरात राहणाऱ्या निर्मला रमेश काबुकडे या महिलेला एका अज्ञात इसमाने घरी येऊन तुम्हाला ‘एका योजनेतील बक्षीस लागले आहे असे सांगून मोहात पाडले.आरोपीने हे बक्षीस पाहण्यासाठी महिलेला हट्ट केला.दरम्यान त्याने महिलेला घरातील सोन्या चांदीचे दागिने दाखविण्यास भाग पाडले.सर्व चाचपणी केल्यावर आरोपीने महिलेला वाहनावर घेऊन जाऊ सातेफळ रोडवर नेऊन सोडून दिले. मिळालेल्या फावल्या वेळेत आरोपीने परत महिलेचे घर गाठून सदर ऐवजावर हात साफ केला.त्यामुळे महिलेला लाडकी स्कीम महागात पडली असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!