बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात 150 गावात मशाल यात्रा पेटल्याने याचा इम्पॅक्ट आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे.आज या मशाल यात्रेचा बुलढाण्यात ‘आक्रोश’ मोर्चाने समारोप होत असल्याने या मशाल यात्रेची धग सरकारपर्यंत निश्चितच पोहचणार आहे. दरम्यान ‘आक्रोश’ मोर्चाची जय्यत तयारी झाल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील 151 गावांमध्ये निघालेल्या मशाल यात्रेचा समारोप आज 22 सप्टेंबरला बुलडाणा येथे आक्रोश मोर्चाने होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात निघालेल्या मशाल यात्रेने मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालेले आहे. या यात्रेचा भव्य समारोप आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून होत आहे. आज होणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे धडाडीचे दिग्गज नेते खा. अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यासह इतरही मोर्चाला संबोधित करणार आहेत.त्यांची तोफ धडाणणार असून संपूर्ण राजकीयांचे याकडे लक्ष लागले आहे.प्रामुख्याने शेतकऱ्यांसह विविध समस्यांना घेऊन कोण कशी तोफ डागेल ? हे आज आक्रोश मोर्चात दिसून येणार आहे.