spot_img
spot_img

मेहकर विधानसभा मतदारसंघात ‘तगडा’ उमेदवार देणार – रविकांत तुपकर यांची घोषणा मेहकरातील बैठकीत ताकदीने लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार… शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे रविकांत तुपकरांचे आवाहन

मेहकर (हॅलो बुलढाणा) शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी,कष्टकरी व तरुणांची ताकद लोकसभेत दिसून आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेत मेहकर मतदारसंघातून तगडा उमेदवार देऊन पूर्ण ताकदीने हा मतदारसंघ लढविणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविकांत तुपकर बोलत होते. येणाऱ्या काळात आपल्याला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठे आंदोलन उभे करायचे असून या आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे आवाहन देखील रविकांत तुपकरांनी केले.

रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मेहकर येथील के.जी. एन.कॉम्प्लेक्स मध्ये अतिशय उत्साहात पार पडली. या बैठकीत सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी होणाऱ्या आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले, त्याचबरोबर आक्रमक आंदोलनाची दिशाही ठरविण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मेहकर विधानसभा मतदारसंघात आपली मोठी ताकद आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता तरुण, अशा सर्वच घटकातील नागरिक आपल्या पाठीशी आहेत, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आपल्याला आला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मेहकर मतदार संघातून चांगला उमेदवार द्यावा, अशी मागणी या मतदारसंघातून सर्वसामान्य जनतेचे होत आहे. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी-कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार असेल व मेहकर विधानसभा अतिशय ताकदीने लढविणार, अशी घोषणा यावेळी रविकांत तुपकरांनी केली. तसेच सोयाबीन- कापूस आंदोलनासाठी तयारीला लागण्याच्या सूचनाही तुपकरांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून याप्रसंगी अनेक तरुण या चळवळीच्या प्रवाहात सहभागी झाले, त्यांचे रविकांत तुपकरांनी स्वागत केले. डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या पुढाकारातून या बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तर या बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!