spot_img
spot_img

उदासीनता !हक्कांचा पैसा मिळेना ! -दिव्यांगांनी केले भिक मांगो आंदोलन !

मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) शासनाकडून दिव्यांगाना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ५ टक्के निधीचे वाटप करण्या बाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याने मलकापूरात दिव्यांगांनी चक्क भीक मांगो आंदोलन केले.

30 ऑगस्ट रोजी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शासना तर्फे दिव्यांगाना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ५ % निधीच्या वाटप करण्या बाबत निवेदन देण्यात आले होते.परंतु ८ दिवस होऊनही निधी वाटप न झाल्याने संस्थेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी मलकापूर नगर परिषद येथे भिक मांगो आंदोलन केले. मलकापूर नगर पालिका यांचे कडून दिव्यांगाचां ५ टक्के निधी मिळविण्यासाठी दिव्यांगांना मोठी संघर्षमय कसरत करावी लागत आहे.हा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. आंदोलने करूनही समस्या सुटत नाही.
मलकापूर नगर परिषद मुख्यधिकारी यांचे कडून दर वेळी निधी वेळेवर मिळत नाही या करिता नुकतेच भिक मांगो आंदोलन करून दिव्यांग नागरिकांनी नगरपालिके विरुद्ध आपला रोष व्यक्त केला.दरम्यान मुख्यधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कार्यक्रमात बुलढाणा गेले असल्याने दिव्यांग नागरिकांना दिव्यांग निधी बाबत चर्चा करता आली नाही. दिव्यांग संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या निधीबद्दल व नवीन नियम टक्केवारी बद्दल विचारणा करावी असे यावेळी उपस्थित नगरपालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नागेश सुरंगे, महाराष्ट्र राज्य सहसचिव पंकज पाटील, राजू रोडे ,अशोक पवार,दिगंबर बोरले,अमर सालवानी,रवींद्र जंगले,अनिल गोठी, एकनाथ जाधव,निखिल पौंदे,सरिता भोई शुभांगी डवले,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!