बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विज्ञानाच्या कक्षा रुंदविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनीसह पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुरेश गवई यांनी येथे केले.जिजामाता महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शनी पोस्टर प्रदर्शनी व मॉडेल प्रदर्शनीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील रसायनशास्त्र विभागामध्ये समाज भूषण पंढरीनाथ पाटील यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक ओझोन दिवस निमित्त पोस्टर प्रदर्शन व प्रतिकृती प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई होते प्रदर्शन चे उद्घाटन प्राचार्य डॉ.सुरेश गवई यांच्या हस्ते झाले यासोबत विज्ञान शाखाप्रमुख व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. संतोष कुंभारे IQAC समन्वयक डॉ. सुबोध चिंचोले , कला शाखाप्रमुख प्रा.डॉ.जे.जे. जाधव , डॉ. डी.जे.कांदे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील ज्ञानाची रुची वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन तसेच यासारख्या पोस्टर प्रदर्शन व मॉडेल प्रदर्शन ची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुरेश गवई यांनी केले विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्रातील विविध मॉडेल्स व पोस्टर्स तयार करून आणली होती व जागतिक ओझोन दिवसाच्या निमित्ताने ओझोन थराबद्दल वेगवेगळी पोस्टर्स व मॉडल्स विद्यार्थ्यांनी तयार करून आणली या प्रदर्शनाला महाविद्यालयातील प्रा.विनय पैकिने, प्रा. डॉ. एन. ढाले, डॉ.अनंत मोरे, डॉ.उके, डॉ. विकास पहुरकर, डॉ.राजश्री येवले , डॉ.योगेश रोडे, डॉ.राम बनकर, डॉ. लोहटे यांची उपस्थिती लाभली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.आनंद देशपांडे, प्रा. डॉ.प्रदीप वाघ , प्रा. उमेश वावगे श्री गुलाबराव भोंगे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी 55 विद्यार्थ्यांनी मॉडेल व पोस्टर तयार करून आणली होती.