spot_img
spot_img

यांच्या घरातील सगळेच आमदार… प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी “महाले” कुटुंबीयावर केला शाब्दिक हल्ला..

चिखली (हॅलो बुलडाणा) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी चिखली येथे महाविकास आघाडीमार्फत आयोजित शेतकरी संघर्ष मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलताना आमदार श्वेता महाले यांच्या कार्यशैलीवर टिका करताना आमदार व “आमदार कुटुंबीय” यांचाही आपल्या भाषणात समाचार घेतला. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल बोंद्रे यांना “भावी आमदार” संबोधून त्यांनी टाळ्यांचा कडकडाट घेतला.”आज आम्ही च्या मागण्या करत आहोत त्या दोन महिन्यानंतर आमचे सरकार जेव्हा येईल तेव्हा निश्चितच पूर्ण होतील, फक्त त्या मागण्या मांडण्यासाठी “आपला माणूस राहुलभाऊ बोंद्रे” हेच आमदार व्हायला हवे.असेही त्यांनी आग्रहाणे मांडले.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही म्हणजे शिवसेना त्यांच्यासोबत होती, म्हणून श्वेता महाले आमदार झाल्या पण आता आम्ही राहुल भाऊ तुमच्या सोबत आहोत तर या वेळेस तुम्हाला आमदार झालेले नक्कीच पाहू असेही प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले.

आमदार श्वेता महाले हे एक ते आमदार झाल्या की त्यांच्यासोबत घरातील सगळेच आमदार झाले?त्यांची पती हे स्वतः आमदार म्हणूनच फिरतात!श्वेता महाले यांचा भाऊ आमदार म्हणून फिरतो, तर त्यांचे वडीलही आमदार म्हणून फिरतात.असे किती आमदार तुम्ही निवडून दिलेत? असा सवाल ही त्यांनी चिखली वासियांना केला.

राहुल बोंद्रे दहा वर्षे या मतदारसंघाचे आमदार होते पण ते आमदार असताना त्यांचा भाऊ किंवा त्यांचे पिता यांनी कधीही त्यांच्या कामात लुडबुड केली नाही.आजचे चिखली मतदारसंघाची अवस्था पाहून मला अगदी किळस येते, एवढी घाणेरडी परिस्थिती आज करून ठेवलेली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!