spot_img
spot_img

इकडे मुख्यमंत्री येणार म्हणून पोलीस व्यस्त अन् तिकडे चोरट्यांचा कारनामा ! -नांदुरा रोडवरील मे. बी. पी. सावजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधील ट्रान्सफार्मरमधील तांब्याची तार लंपास!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके)मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बुलढाण्यात असल्यामुळे सर्व पोलीस भाऊच फाटा बंदोबस्तात व्यस्त होता.दरम्यान मलकापुरात नांदुरा रोडवरील मे. बी. पी. सावजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधील ट्रान्सफार्मरमधील तांब्याची तार लंपास केल्याची घटना घडली.

नांदुरा रोडवरील मे. बी. पी. सावजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधील ट्रान्सफार्मर (विद्युत – रोहित्र) ७५० के. एम. मधील तांब्याची कॉईल तार व ६०० लिटर ऑईल चोरट्यांनी लंपास केली असल्याची तक्रार फॅक्टरीचे पार्टनर राजेश दत्तात्रय महाजन यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मे. बी. पी. सावजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मधी ल ट्रान्सफार्मरमधून तांब्याची कॉईल तार अंदाजे १२०० किलो व त्यामध्ये असलेले ऑईल ६०० लिटर असे अंदाजे १२ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच ११ केव्हीए लाईनची सुध्दा यावेळी तोडफोड करण्यात आली असून काही प्रमाणात केबल सुध्दा चोरीला गेली आहे. तेव्हा या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्यात येऊन आम्हाला चोरीस गेलेला माल परत मिळवून दयावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!