बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आहेत.त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमावर चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.अर्थात हा खर्च जनतेच्या खिशामधून करण्यात येत आहे असे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मिडियाला सांगितले.
काँग्रेस कार्यकर्ते आज उपोषण करतील आणि कार्यक्रमात व्यत्यय निर्माण करतील या कारणामुळे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.दरम्यान त्यांनी मीडियासमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की,मागच्या काळात मुख्यमंत्री बुलढाण्याला आले असताना तब्बल 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.आता मुख्यमंत्री पुतळ्यांच्या अनावरण करण्यासाठी बुलढाण्यात येत असताना शिवसेना शिंदे गटाकडून तब्बल चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च शासकीय तिजोरी रिकामी करण्याचा प्रकार असून,अर्थात नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. नागरिक जे टॅक्स भरतात ती रक्कम शासन तिजोरीत जमा होते.आणि त्याच रकमेचा दूरोपयोग नेत्यामंत्र्यांच्या दौऱ्यावर पैसे उधळल्या जाऊन करण्यात येतो.पोलिसांनी मला अटक केली कारण पोलीस सत्याला ते घाबरलेत असेही सपकाळ म्हणाले.