spot_img
spot_img

BREAKING ‘कानफडं फोडू!’ आम.गायकवाडांचा इशारा; आंबींचं थेट आव्हान;घरासमोरच वाचनाचा प्लॅन; भिडणार का दोन गट? बुलढाणा टेन्शनमध्ये!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने बुलढाण्यातील वातावरण अक्षरशः पेटलं असून शहरात तणाव शिगेला पोहोचला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नाकेबंदीमुळे शहर अक्षरशः छावणीत बदललं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार येणार का यावर सस्पेन्स कायम असून त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, कम्युनिस्ट कार्यकर्ते प्रशांत आंबी बुलढाण्यात दाखल झाल्याची जोरदार चर्चा असून पोलिसांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली आहे.

वाद अधिक चिघळण्याचं कारण ठरलं ते ‘शिवाजी कोण होता?’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या जाहीर वाचनाचं आवाहन. यावरून आमदार गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, एकेरी उल्लेख केल्यास ‘कानफडं फोडू,’ असा इशारा दिला.

याला प्रत्युत्तर देताना प्रशांत आंबी यांनी थेट गायकवाड यांच्या घरासमोरच पुस्तक वाचन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकतेचं मिश्र वातावरण निर्माण झालं आहे. बुलढाण्यात काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!