बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा स्वतःला मोठे समजता काय ? असा प्रश्न फेसबुक पोस्टवर अधोरेखित करून काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री यांच्या आगमनापूर्वी या प्रकाराचा धिक्कार केला आहे.
त्याचे कारण असे की, मुख्यमंत्री बुलढाण्यात येणार असल्याने सजविण्यात आलेल्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राकृतीच्यावर आमदार संजय गायकवाड यांचा फोटो झळकत आहे. शिवरायांच्या फोटोवर झळकविण्यात आलेल्या आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोमुळे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात वाचा…संस्कार – सभ्यता-भान नसेल तर काय होते?आत्मप्रौढी, अहंकारालाही सीमा असते..इतर संकेताची चक्क पायमल्ली..आता कशी मागावी महाराजांची क्षमा???आमदार गायकवाड तुम्ही काय स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजता काय? या विकृतीचा त्रिवार धिक्कार ! अशी फेसबुक पोस्ट सपकाळ यांनी व्हायरल केली आहे.या फेसबुक पोस्टवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.दरम्यान जनाची नाही तर मनाची लाज बाळगा महाराजांवर स्वतःला दाखवणे हा तर विकृतीचा कळस असून,शर्म करो असे म्हणत सपकाळ यांनी धिक्कार नोंदविला आहे.