बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह मंत्रीगण बुलढाण्यात पुतळे लोकार्पणासाठी येत आहेत. दरम्यान शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आली असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. आयोजकांनी माहोल निर्माण केलाय. ‘चिखली रोडवरील पेट्रोल पंपा समोरील एका इमारती वरून मुख्यमंत्री आणि आमदार यांचा फोटो असलेला एक मोठा बलून हवेत सोडला असून कार्यक्रमाची चांगलीच हवा निर्माण करण्यात येत आहे.
आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा व स्मारकांचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी काही दिवसापासूनच जय्यत तयारी करण्यात आली.आज जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 7 डीवायएसपी 20 पिआय दर्जाचे अधिकारी,100 एपीआय आणि पीएसआय, 700 पोलीस कर्मचारी, 525 होमगार्ड आणि 2 दंगा काबू पथक असा तब्बल 1600 पोलीस -होमगार्ड यांचा ताफा शहरात तैनात करण्यात आला आहे.