बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा व स्मारकांचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा सुधारित दौरा जाहीर करण्यात आला.
दुपारी १२.३० वा. आयटीआय समोर मलकापुर रोड बुलढाणा येथे मान्यवरांचे हेलिकॉप्टरने आगमन होईल.
दुपारी १२.३५ वा. मान्यवरांना मानवंदना व स्वागत होणार आ. संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा
शिवरत्न शिवा काशिद स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ व बाल शिवाजी स्मारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई स्मारक, महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले
स्मारक. दुपारी १२.४० वा. भगवान वीर एकलव्य स्मारक, संत रविदास महाराज स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक.
वसंतराव नाईक स्मारक, राजश्री शाहु महाराज स्मारक, महात्मा बसवेश्वर स्मारक
वे दुपारी १.४० वा. पर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, तानाजी मालुसरे स्मारक, नरवीर बाजीप्रभु देशपांडे स्मारक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे नवीन भुसंपादन व पुनर्वसन कार्यालय इमारतीचे लोकार्पण तसेच बि.एस.सी अॅग्री कॉलेज भुमीपुजन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
दुपारी १.४० ते २.०० पर्यंत अमोल हिरोळे बुलढाणा यांच्या घरी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे त्यानंतर दुपारी २.१० वा.
शारदा हायस्कुल बुलढाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे.३.४५ वाजता राज्य गीत पोलीस बँड पथक
राष्ट्रगीत सादर करणार तर कारंजा चौक बुलढाणा येथील अग्रसेन महाराज स्मारकांचा व जैन स्तंभाचा लोकार्पण सोहळा ३.५० वाजता होणार आहे. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर
दुपारी ४.०० वाजता मुख्यमंत्री हेलिपॅडकडे रवाना होणार आहेत.