spot_img
spot_img

आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार ढिम्म ! -सुरक्षे संदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष ! – या तरूणाच्या पाण्यात बुडून मृत्यूला जबाबदार कोण?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणपती विर्सजण करण्याकरिता गेलेल्या २४ वर्षीय तरूणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे. हि घटना १७ सप्टेंबर रोजी मलकापूर रोडवरील चौधरी यांच्या पेट्रोल पंपासमोर असलेल्या तलावात सायंकाळच्या सुमारास घडली आहे.परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक आपत्ती विभाग तथा पोलीस विभाग येथे तैनात नव्हता का?शिवाय नगरपालिका तरी काय करते ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बुलढाणा शहरात सर्व ठिकाणी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्याकरिता बुलढाणा नगरी आपआपल्या ठिकाणी होती. मात्र मलकापूर रोडवर २४ वर्षीय युवक बाप्पाला निरोप देण्याकरिता गेला मात्र तो सुध्दा परत आला नाही. अण्णा भाऊ साठे नगरात राहणारा नयन गजानन नाटेकर वय वर्षीय २४ वर्षीय हा युवक १७ सप्टेंबर रोजी मलकापूर रोड वरील तलावात गणपती बाप्पाला विर्सजण करण्याकरिता गेला होता. मात्र गणपती विर्सजण करित असताना त्याचा तोल गेला आणि तो
पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळाल्यावर विलंबाने आपत्ती विभाग घटना स्थळी दाखल झाला मात्र रात्रीचा अंधार असल्यामुळे तो दिसून आला नाही. आज सकाळी परत टिमने शोध घेतला असता तो दिसून आला आहे.नेहमीच अशी कारवाई उशिरा होते.बुडालेला मृतदेह शोधण्यात
आपत्ती विभाग टेन्शन घेत नाही.कारण त्यांना माहीत असते की दुसऱ्या दिवशी प्रेत पाण्यावर तरंगून येईल !त्यामुळे नैसर्गिक आपत्ती विभागाबाबतही संताप व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!