spot_img
spot_img

‘बुक्कीत टेंगूळ अन् चाकूचे सपासप वार ! -‘विघ्नहर्त्या’च्या आरतीच्या कारणावरून मारहाणीचे उद्भवले विघ्न! -एक जण गंभीर जखमी तर 3 आरोपींना अटक!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) गणेशोत्सवासाठी वर्गणी दिली नाही म्हणून गणपतीची आरती न करू दिल्याने उफाळलेल्या वादात एकाला चापटा बुक्क्यांनी चोप देत पाच ते सहा चाकूचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना देऊळगाव राजा येथील शिवाजी नगरात उघडकीस आली.पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून जखमीला उपचारार्थ छत्रपती संभाजी नगर येथे दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादी रामेश्वर दत्तात्रय पवार यांनी पोलिसांना तक्रार दिली की,शिवाजीनगर मल्हारी भुसारी यांच्या घराजवळ खाजगी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता श्री गणेशाची आरती करण्याच्या कारणावरून आरोपी अंकुश हरिभाऊ घोंगे वय 35,सौ कविता अंकुश घोंगे, वय 32, शिवाजी विठ्ठल घोंगे वय 62 रा. देऊळगाव राजा यांनी बाळू उर्फ परमेश्वर दत्तात्रय पवार यांच्याशी वाद घातला.तू वर्गणी दिली नाही तुला आरतीचा मान नाही असे म्हणून शिवीगाळ केली व चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी अंकुश घोंगे याने स्वतः जवळील चाकू काढून पाच ते सहा चाकूचे वार केले. त्यामुळे बाळू पवार वय 35 हे जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान पोलिसांनी तपास हाती घेऊन सौ कविता अंकुश घोंगे,शिवाजी विठ्ठल घोंगे या दोघांना अटक केली.मात्र अंकुश घोंगे हा आरोपी फरार झाला होता.
त्याला 14 सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा येथून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणातील इतरही आरोपींचा शोध घेतल्या जात आहे.आरोपीं विरोधात अपराध नंबर 357/2024 कलम 189(4), 191(1), 191(2), 191 (3), 190, 109, 115 भारतीय न्यांय संहिता – 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक, बी.बी.महामुनी अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मनिषा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या
मार्गदर्शनाखाली अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा, संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक,
देऊळगाव राजा, व पोउपनि दत्ता नरवाडे, पोउपनि भारत चिरडे, व पोलीस पथकाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!