बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एलसीबीने कारवाईचा धडाका लावला असून,आज पुन्हा 2 चोरटे एलसीबीच्या गळाला लागले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बुलढाणा येथील शासकीय कार्यालयातील 40 हजारांच्या साहित्याच्या चोरी प्रकरणी एलसीबीने दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बुलढाणा या शासकीय कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातील 55 इंची एलईडी डिस्प्ले व इतर साहित्य असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात तपासचक्र फिरविण्यात आल्याने पथकाने दोन आरोपींना आज अटक केली. उमेश मनोज पातालबंसी (27),रा.परदेशी पुरा बुलढाणा,विशाल सुनील तिवारी रा.वॉर्ड नंबर 2 बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.या प्रकरणातील शेख रशीद नावाचा चोरटा सध्या फरार आहे.














