spot_img
spot_img

एलसिबी झाली ॲक्टिव्ह! -दोन दुचाकीस्वारांना ठोकल्या बेड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक गुन्हे शाखा सध्या ॲक्टिव्ह झाली असून, पथकाने दोन दुचाकीस्वारांना अटक करत त्यांच्याकडून एक दुचाकी जप्तीची कारवाई केली आहे. नांदूरा, बोराखेडी आणि मुक्ताईनगर येथील 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात आरोपीतांचा शोध घेवून नांदूरा अप.क्र 412/2024 कलम 303 (2) भा. न्या. सं. गुन्ह्याचा तपास करण्यात आला.फिर्यादी जयप्रभू शंकर भगत रा. कोकलवाडी ता. नांदूरा यांनी सहा जुलै रोजी शेतामध्ये उभी करुन ठेवलेली प्लॅटीना मो.सा.क्र. MH-28 BP-6448 किं. 35,000 रुपये ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी सदर गुन्ह्याचा तपास करुन, गुन्ह्यात 2 आरोपी यांना मलकापूर आणि मुक्ताईनगर परिसरातून अटक करण्यात आली.
राजू मंगल जगताप वय 28 वर्षे रा. बेलाड ता. मलकापूर,श्रावण देवसिंग भोसले रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर असे आरोपींची नावे आहे.त्यांच्या ताब्यातून प्लॅटीना कंपनीची एक दुचाकी जप्त करण्यात आली. शिवाय त्यांनी पो.स्टे. नांदूरा, बोराखेडी तसेच जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील 3 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!