spot_img
spot_img

ब्रेकिंग! चोर- पोलिसांच्या खेळात ‘समृद्धीवर’ अपघात! -उभ्या ट्रकमधून करीत होते डिझेल चोरी! -एका चोरट्यासह 35 लिटरच्या 10 कॅन जप्त! -3 चोरट्यांनी दिला पोलिसांना गुंगारा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटना काही नव्या नाहीत.महामार्ग पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकून डिझेल चोरी केली जातेय.परंतु आज भल्या पहाटे डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला चांगलीच अद्दल घडली.उभ्या ट्रक मधील डिझेलच्या टाक्या चोरून इंडिगो गाडीमध्ये टाक्या खाली करणाऱ्या 4 ते 5 गुन्हेगारांचा पोलिसांनी पाठलाग केला असता, इंडिगो गाडी गेटवर धडकल्याने अपघात झाला आणि चालक पोलिसांच्या हाती लागला. मात्र 2 ते 3 जणांनी यावेळी पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. याप्रकरणी 10 डिझेलच्या टाक्या जप्त केल्या असून,ही घटना महामार्ग पोलीस उपकेंद्र दुसरबीड सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावर 13 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजता घडली आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असते. समृद्धी महामार्गावर अनेक बेकायदेशीर धंदे सुरु असून, लुटमार व चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे.या महामार्गावर डिझेल चोरीच्या घटना अनेकदा घडल्या.पोलिसांच्या कारवाईनंतरही डिझेल चोर सक्रिय असून पोलिसांना आव्हान देत आहे.समृद्धी महामार्गावरील महामार्ग पोलीस उपकेंद्र दुसरबीड -फरदापुर – सिंदखेडराजा जवळ मुंबई कॉरिडोर क्रमांक 310 वर उभे असलेल्या ट्रक मधून इंडिगो गाडी मधून आलेले 4 ते 5 डिझेल चोर डिझेलचोरी करीत असल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर पोलिसांना मिळाली.दरम्यानस्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून एम एच 28 व्ही 9310 क्रमांकाच्या इंडिगो कारचा पाठलाग केला.इंडिगो कार दमटवीत असताना चायनल नंबर 314 मुंबई कॉरिडोर जवळ महामार्गावरील गेटवर धडकल्याने अपघात झाला.पोलीस पोहोचेपर्यंत दोन ते तीन चोरटे फरार झाले तर जखमी झालेला चालक पोलिसांच्या हाती लागला आहे.या अपघात ग्रस्त कारमधून डिझेलच्या 35 लिटरच्या 10 टाक्या ताब्यात घेण्यात आल्या असून,कार व कारचालक आरोपीला बीबी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून,स्थानिकपोलिसांसह पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर, निवृत्ती सानप, अरुण भुतेकर, संदीप किरके, योगेश शेळके यांनी सादर कारवाई केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!