बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या एका नोकरदाराने महिला कर्जदारांकडून तब्बल 4,06,633 रुपयांची आठवड्याची किस्त गोळा करून पोबारा केल्याची घटना आज बोराखेडी पोलीस ठाणे अंतर्गत समोर आली आहे.
विक्की लक्ष्मण रोहनकर वय 25,राहणार आडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला असे आरोपीचे नाव आहे.
बोराखेडी पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, फिर्यादी संदीप खंडेराव रा.वाडगाव तालुका संग्रामपूर जि. बुलढाणा यांनी तक्रार दिली की, आरोपी विक्की रोहनकर हा भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी उपशाखा नांदुरा येथे नोकरी करतो. 30 ऑगस्ट 2024 रोजी आरोपीने मोताळा,दिढोळा,अंत्री व बोराखेडी गावात महिला कर्जदारांकडून कर्जाची आठवड्याची किस्त तब्बल 406633 रकमेची वसुली केली. सदर रक्कम आरोग्य ने रात्री आठ वाजताच्या सुमारास भारत फायनान्स नांदुरा येथे भरणे अनिवार्य होते.परंतु त्याने ही रक्कम भारत फायनान्स नांदुरा शाखेत जमा न करता आपला फोन स्विच ऑफ करून ठेवला.गोळा केलेली सर्व रक्कम घेऊन पोबारा केला.रक्कम जमा करण्याची जबाबदारी असल्याची माहिती असूनही आरोपीने भारत फायनान्स कंपनीचा फौजदारी पात्र न्यास भंग केल्याने या अपहार प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 316 (5)डीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.














