मेहकर (हॅलो बुलढाणा/सतिश मवाळ) मेहकर तालुक्यातील मौजे कासारखेड येथील सतीश सवडतकर यांनी गुरांच्या गोठ्याची फाईल मेहकर पंचायत समितीने मंजुरीसाठी नाकारली.मात्र ती कोणत्या कारणामुळे नाकारली याची माहिती सवडतकर यांना मिळाली नाही. संबंधितांना तक्रार देऊनही कार्यवाही झाली नसल्याने मेहकर पंचायत समितीच्या योजनांची विशेष समिती मार्फत चौकशी करा अन्यथा उपोषण करण्याचा सवडतकर यांनी दिला आहे.
सतीश सवडतकर हे पंचायत समिती येथे चकरा मारून त्रस्त झाल्यानंतर त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना रितसर तक्रार नोंदवली आहे.१३ मार्च २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालय मेहकर येथे फाईल सादर करून आजपर्यंत मंजुरी का देण्यात आली नाही? यांची चौकशी करून मान्यता मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. पैसे दिल्यास त्वरित फाईल मंजूर होते.असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माझ्या गोठ्याला मंजुरी देण्यात यावी व पंचायत समितीच्या योजनांची विशेष समिती मार्फत चौकशी करावी अन्यथा मी दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सतीश दादाराव सवडकर यांनी दिला आहे.