spot_img
spot_img

हॅलो बुलढाणा एक्सक्लुझिव्ह ठरले! संदीप शेळके यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हॅलो बुलढाणाने दिलेली बातमी अखेर खरी ठरली! काही दिवसांपूर्वीच हॅलो बुलढाणाने दिलेल्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झाले असून युवा उद्योजक संदीप शेळके यांनी शिवसेना (उबाठा)ला सोडचिट्ठी देत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन, दादर येथील काँग्रेस कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष मा आमदार राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत शेळके यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

संदीप शेळके यांनी यापूर्वी बुलढाणा लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात आधीच संघटनात्मक मरगळ जाणवत असताना शेळके यांचा हा निर्णय आगामी राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.दरम्यान, ही मोठी राजकीय घडामोड सर्वप्रथम हॅलो बुलढाणानेच उघडकीस आणली होती, आणि आता त्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!