बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यात काँग्रेसच्या युवा फळीत १७ जणांची भर पडली असून, NSUIच्या शहराध्यक्षपदाची धुरा आदित्य साळवे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष तुषार खरे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी अमन चव्हाण उपस्थित होते.
NSUIचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऋषभ साळवे यांच्या माध्यमातून आदित्य साळवे यांच्याशी संघटनात्मक संवाद झाला. या संवादातून आदित्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ साळवे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षसंघटनेत सक्रियपणे काम करण्याची भूमिका घेतली.
पक्षप्रवेश केलेल्या युवकांमध्ये स्वप्नील आराख, प्रतीक गावंडे, पियुष मोर, अनुराग इंगळे, निखिल चव्हाण, चेतन जाधव, आदित्य खठाळे, कार्तिक मुळे, सोहम देशमुख, विशाल राजपूत, सार्थक चव्हाण, तेजस कानळजे, आर्यांन साभळे, गणेश सरकटे, तथागत हिवाळे, अविनाश जाधव आणि गोपाल सावंत यांचा समावेश आहे.या नव्या फळीमुळे विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





Total Users : 3720172